तुकाराम बाबा यांच्या प्रमुख उपस्थिती खडकी येथे गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न


प्रतिनिधी(जतवार्ता न्यूज): मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील गुरूदत्त अध्यात्मिक आश्रमातील मठात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांनी केला होते. १९ डिसेंबर पासून सोहळ्यास प्रारंभ झाला. २३ डिसेंबर रोजी पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यास चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम महाराज, इंचगिरी मठाचे मठाधिपती प्रभुदेव महाराज,  कोल्हापूरचे आनंद सिध्देश्वर महाराज, तनाळी मठाचे शिवाजी महाराज, जामगाव मठाचे दत्तात्रय महाराज बठे, शिंगणापूर मठाच्या मिराताई महाराज, मारोळी मठाचे संदेश महाराज, सोलापूरचे तानाजी महाराज, व्हेनमराठे महाराज, हुन्नर मठाचे खताळ महाराज, मंगळवेढा येथील शारदाताई महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
          सोहळ्यात बोलताना हभप तुकाराम महाराज म्हणाले की, समाजजागृतीचे महत्वाची जबाबदारी ही साधू संतांची आहे. संत ज्ञानेश्वर, श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांनी सर्वसमान्यांचे हित, रूढी, परंपरा डोळ्यासमोर ठेवून काम केले. कोरोनाच्या या कठीण काळात यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य केले. २०२०, २०२१ ही दोन वर्षे कठीण गेली. लॉक डाऊन काळात लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते, काम नसल्याने जगणे अवघड झाले होते. या काळात आपण स्वतः साडेपाच हजाराहून अधिक जणांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. ५० हजाराहून अधिक जणांना घरपोच भाजीपाला वाटप केला, हजारो जणांना मास्क, सॅनिटायझर व अन्नदान केले. माणसातला देव ओळखून सर्वांनी काम करावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
         यावेळी दामाजी संस्थांनचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे, धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, प्रणव परिचारक, जि. प. सदस्य शिवाजी नागणे, अहमदनगरचे जि. प.सदस्य बबन मदने, पंढरपूरचे नगरसेवक जगदीश जोजारे, मंगळवेढ्याचे नगरसेवक सचिन शिंदे,घुले मेजर, शिरूर पुणे येथील काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात आदी उपस्थित होते.

खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांनी खडकीत गुरुचरित्र अनुष्ठान हा आगळा वेगळा सोहळा आयोजित करून आदर्श कार्य केले आहे. अध्यात्मिक क्षेत्रात खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments