अचकनहळळी येथील कोळी कुटुंबास विक्रम फौंडेशन जत कडून २ लाखाची मदत सुपूर्दजत/प्रतिनिधी: अचकनहळळी ता.जत येथील वायरमन लक्ष्मण तुकाराम कोळी यांच्या कुटुंबास विक्रम फौंडेशन जत व शिंदे परिवार अचकनहळळी तसेच गावकरी यांचेवतीने २ लाख १० हजार रुपयांची आर्थिक मदत कोळी कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
         कै.लक्ष्मण कोळी हे अचकनहळळी ता.जत येथे गेली चार वर्षापासून वायरमन या पदावर काम करीत होते. शुक्रवार दि.२६/११/२०२१ रोजी दुपारी ०१:०० च्या दरम्यान दैवाने त्यांच्यावर घाला घातला टी.सी.वर काम करीत असताना लक्ष्मण कोळी यांना शॉक लागून ते डांबवरून खाली पडले. हि बातमी काळातच गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे व राजू घाडगे यांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत येथे आणले असता त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याची सविस्तर माहिती गावाचे उपसरपंच पिंटू स्वामी यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांना दिली. आमदार सावंत यांनी तातडीने जत ग्रामीण रुग्णालय गाठले आणि  सविस्तर माहिती घेऊन संबंधित महावितरण च्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कोळी कुटुंबीयांना शासकीय जी मदत देता येईल त्याबाबत सूचना दिल्या.
         कै.लक्ष्मण कोळी यांच्या पश्चात तीन वर्षाचा लहान मुलगा ,सहा महिन्याची मुलगी,पत्नी ,आई भाऊ,भावजयी असा परिवार आहे. घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाच पण आर्थिक आधारही संपला त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गावकरी व सामाजिक संघटना यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रम फौंडेशन जत, समस्त शिंदे परिवार, गावकरी मंडळी व मित्र मंडळी यांनी लक्ष्मण कोळी यांच्या कुटुंबास २०१०००/- ची रोख रक्कम आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली.
        यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत ,माजी सभापती बाबासाहेब कोडग,महावितरण जत चे अधिकारी सचिन माळी, सुतार साहेब, ग्रामपंचायत उपसरपंच पिंटू स्वामी ,सदस्या चंपाबाई शिंदे,मधुकर शिंदे सर ,अण्णासाहेब कोळी,राहुल पाटील ,नंदकुमार पाटील ,अनिल कोळी ,बबन शिंदे ,पांडुरंग शिंदे,शामराव शिंदे, किसन शिंदे, बसवराज कोरे,मल्लू कोरे, अप्पू पुजारी, भिमू कोळी, जनार्दन शिंदे,बाळू कटरे, बबन पाटील, आदिजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments