महादेव बुरुटे यांना बालवाङ्मय पुरस्कार जाहीरजत/प्रतिनिधी: शेगाव ता. जत येथील कवी, लेखक महादेव बी. बुरुटे यांच्या भुताचं झाड या बालकथा संग्रहास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार २०२० जाहीर झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष साहित्यिक विजय चोरमारे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे कळविले असून सदर पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे आहे. 
          दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने या वेळी विविध साहित्य प्रकारातील पुरस्कारांची घोषणा केली असून ते २ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम व सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी सांगितले साहित्यिक बुरुटे यांनी विविध प्रसिद्धी माध्यमांतून लेखन केले आहे. त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात नऊ बालसाहित्याची पुस्तके आहेत. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

Post a Comment

0 Comments