जत येथिल श्री. स्वामी समर्थ मंदिरात चित्रित झालेल्या झी टाॅकीज प्रस्तुत गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या किर्तन महोत्सवाचे दि. ७ ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत प्रसारणजत/प्रतिनिधी: जत येथिल श्री. स्वामी समर्थ मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री. स्वामी कृपेने व सर्वांच्या सहकार्याने ,तसेच झी टाॅकीज चे सल्लागार व महाराष्ट्रातील झी टाॅकीज फेम सुप्रसिद्ध किर्तनकार ट्रस्टचे कुटुंबप्रमुख ह.भ.प. सागर महाराज बोराटे (नातेपुते) जि.सोलापूर यांच्या प्रयत्नांमुळे दि. ३ डिसेंबर २०२१ ते दि. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत जत येथिल श्री. स्वामी समर्थ मंदिरात झी टाॅकीज प्रस्तुत गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व किर्तन सोहळ्याचे प्रसारण झी टाॅकीज च्या गजर किर्तनाचा व सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये मंगळवार दि.७ डिसेंबर २०२१ पासून ते गुरूवार दि. २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत प्रसारण होणार असून जतकरानी व सांगली जिल्ह्यातील तमाम किर्तनप्रेमिनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत, शुभम प्राॅडक्शन व झी टाॅकीज ने केले आहे.

Post a Comment

0 Comments