ज्ञानरूपी प्रकाश जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे माध्यम बनावे- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

निरंकारी संत समागमाची यशस्वी सांगता  ‘‘वर्तमान काळात जगामध्ये संत-महात्म्यांची नितांत आवश्यकता आहे, त्यांच्याकडून शिकवण प्राप्त करुन सर्वांनी भक्तीमार्गावर अग्रेसर होऊन स्वत: आनंदी जीवन जगत असताना सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानरूपी प्रकाश पोचविण्याचे माध्यम बनावे.’’  
सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी 74व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहामध्ये वर्चुअल माध्यमातून जगभरातील भाविक भक्तगणांना आवाहन करताना वरील उद्गार काढले. सोमवार, 29 नोव्हेंबर, 2021 रोजी या तीन दिवसीय समागमची यशस्वीरित्या सांगता झाली ज्याचा भरपूर आनंद मिशनची वेबसाईट व साधना टी.व्ही.च्या माध्यमातून जगभरातील भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी प्राप्त केला.
सद्गुरु माताजींनी सांगितले की, ब्रह्मज्ञाना द्वारे भक्तीपथावर चालत राहून ईश्वरावर दृढ़ विश्वास बाळगल्याने जीवन आनंदित होते. जेव्हा आपण परमात्म्याला जीवनाचा आधार बनवतो आणि समर्पित भावनेने सत्संग, सेवा व नामस्मरण करत त्याच्याशी समरस होतो तेव्हा खऱ्या अर्थाने हे जीवन सुगंधित होते. म्हणूनच आपण प्रभुनामाच्या रंगात सदोदित रंगून जावे ज्यायोगे आपला विश्वास इतका पक्का करावा, की तो कोणत्याही परिस्थितीत दुलायमान होणार नाही. 
कवि संमेलन
समागमाच्या सांगता समारोहामध्ये एक बहुभाषी कवि संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ‘श्रद्धा भक्ति विश्वास असावा, मनामध्ये आनन्द वसावा’ या शीर्षकावर अनेक कविंनी हिंदी, पंजाबी, मुलतानी, हरियाणवी, उर्दू व इंग्रजी भाषांतून आपापल्या कविता सादर केल्या.

Post a Comment

0 Comments