जत येथे राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा संपन्न; कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

◆जत तालुक्यातील खेळाडूंना लागेल ती मदत भारती विद्यापीठाच्यावतीने केली जाईल; ना. विश्वजीत कदम

◆राज्य क्रॉस-कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्वजत(जॉकेश आदाटे):- रोजी राजेरामराव महाविद्यालय, जत येथे महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन, सांगली व विक्रम फाऊंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेचे उदघाटन  आमदार विक्रमदादा सावंत व बक्षिस वितरण नामदार कृषी राज्यमंत्री  विश्वजीत कदम यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष  अभयकुमार साळूंखे व  शार्दुराजे डफळे (सरकार) यांची प्रमुख उपस्थिती होती.
           या राज्यस्तरीय स्पर्धेत वयोगटनिहाय स्पर्धेचे उदघाटन प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आले. यावेळी राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य एस्.एस्. पाटील, महाराष्ट्र अॅथलेटिक असो.चे उपाध्यक्ष  राजू प्याटी, संजय पाटील, सहसचिव दिनेश भालेराव, प्रांत अधिकारी जोगेंद्र कटयारे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, पंचायत समिती सदस्य दिग्वीजय चव्हाण, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, माजी सरपंच मारूती पवार, जिल्हा क्रीडा संघटक संजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
           नामदार कृषी राज्य मंत्री तथा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू विश्वजीत कदम बक्षिस वितरण समारंभाच्यावेळी म्हणाले की, या राज्य क्रॉस-कट्री स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्हा संघटनेने व विक्रम फाऊंडेशनने अतिशय देखणे व उत्कृष्ठ केले आहे. याचा मला अभिमान वाटतो. तसेच जत तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात लागेल ती मदत खेळाडू, मार्गदर्शक व संघटक यांना भारती विद्यापीठाच्यावतीने केली जाईल. प्रसंगी काही गरीब व होतकरू खेळाडूंना दत्तक घेतले जाईल.
          या स्पर्धा भरविण्याचा मुख्य उद्देश आमदार विक्रमदादा सावंत यांनी सागीतला की, जतचे रणजी क्रीकेटर कै. विजयसिंह डफळे (सरकार) यांचा जतच्या क्रीडा क्षेत्रातील वारसा व परंपरा जपण्यासाठी तसेच जत तालुक्यातून विशेषता ग्रामीण भागातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व संघटक घडावेत या साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेते खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, ट्राफी व सर्वसाधारण विजेतेपदासाठी चषक प्रमुख पाहूण्याच्याहस्ते देण्यात आला.

राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. 
●खुलागट पुरूष:- १) प्रल्हाद धनवट ३०.५३ औरंगाबाद, २) आदेश यादव - ३०.५८ नाशिक, ३) उपेंद्र बलियान- ३१.४३ नाशिक, ४) विवेक मोरे - ३२.०९ कोल्हापूर, ५) सिध्दांत पुजारी- कोल्हापूर ६) प्रतिक उंबरकर ३२.४५ सातारा 

●खुलागट महिला:- १) संजिवनी जाधव-३६.३२ नाशिक, २) कोमल जगदाळे - ३६.४७ नाशिक, ३) रेश्मा केवटे- ३७.४२ सातारा, ४) निकिता राऊत - ३८.२० नागपूर, ५) प्राची गोडबोले- ३९.१३ नागपूर, ६) जन हुलवान- ३९.१८ सातारा 

●२० वर्षाखालील मुले:- १) अंकितकुमार- २६.०१ पुणे, २) इंद्रजित फराकटे-२६.०८ कोल्हापूर, ३) तरण घादुले - २६.०९ अहमदनगर, ४) ओंकार पन्हाळकर- २६.३१ कोल्हापूर, ५) अभिषेक देवकते २६.३९ कोल्हापूर, ६) दादा शिंगाडे-२६.५९ सातारा,

●२० वर्षाखालील मुली:- १) रिंकी पवार २२.१७ नाशिक, २) प्राजत्का शिंदे - २२.५१ कोल्हापूर, ३) पल्लवी जगदाळे - २३.२४ नाशिक ४) विषाखा साळूंखे - २३.२९ सातारा, ५) भाग्यश्री भंडारी - २३.३५ अहमदनगर, ६) शिवानी कुलकर्णी - २४.१५ 

●१८ वर्षाखालील मुले:- १) सुजित तिकोडे - १९.४२ कोल्हापूर, २) अदित्य पाटील - १९.४४ कोल्हापूर, ३) गौरव भोसले - २०.०३ पुणे, ४) किशोर कामखाने- ३०.२५ औरंगाबाद, ५) पियुष मसाने २०.२९ आमरावती, ६) सचिन पवार -२०.३७ परभणी

●१८ वर्षाखालील मुली:- १) श्रुष्टी रेडेकर- १४.३८ कोल्हापूर २) तन्वी खोरणे - १४.४९ वाशिम, ३) गायत्री पाटील- १५.०३ रायगड, ४) प्राची देवकर - १५.०८ सातारा, ५) वैष्णवी ऐवर १५.३७ वाशिम, ६) पुर्वा शेवाळे- १५.४३ कोल्हापूर

●१६ वर्षाखालील मुले:- १) केशव पन्हाळकर - ६.०७ कोल्हापूर, २) मोहित जगताप- ६.०८ सातारा, ३) स्वराज जोशी- ६.१७ रत्नागीरी, ४) अप्रित मिश्री - ६.२५ रायगड, ५) हर्षद कदम - ६.२९ कोल्हापूर, ६) राजेंद्र इंपाल- ६.३० नाशिक,

●१६ वर्षाखालील मुली:- १) भव्यश्री महाले - ७.०५ नागपूर, २) स्वाती कल्होळे-७.१३ कोल्हापूर, ३) साक्षी भंडारी - ७.२० अहमदनगर, ४) मानसी यादव - ७.२९ पुणे, ५) वैभवी कुंभार -७.३९ कोल्हापूर, ६) आदिती पाटील-७.४३ पालघर

          या बक्षिस वितरण समारंभात जत तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त युवराज खटके, मल्लीकार्जुन बिराजदार, परवेज गडीकर, हर्षदा सावंत व सुहास व्हनमाने यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
           कै. राजा स्वामी सर व कै. प्रा. वसंतराव जाधव सर या दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटकानी सांगली जिल्हा व जत तालुक्यात क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांच्याच प्रेरणेतून तयार झालेले आंतरराष्ट्रीय खेळाडू शामराव गावडे, विजयमाला पाटील, मंगल फोंडे, भास्कर भोसले व राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब माने, सौ. गंगा बिराजदार, महेश पाटील, गणेश सिहासने, समिर सनदी, अभिजित पाटील, संतोष पाटील, आक्रम मुजावर, अश्विनी दुकानदार, स्वाती व्हनवाडे, ज्ञानेश्वर आवटे, सुरेश मोटे, उत्तम मोटे, नागेश मोटे, बाळासाहेब वाघमोडे, मनोहर मोटे, मोहन ठवरे, शहाजी ठवरे, तात्यासाहेब कांबळे, कपीला खवासे, शारदा, पाटील, लिंगराज सरगर, बापू सरगर, मनिषा चपने, माया शिंदगी यातील बरेच खेळाडू उपस्थित होते. सर्व खेळाडू कै. स्वामीसर व कै. जाधवसर यांच्या प्रेरणेतून घडले.
            या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक सिद्राम चव्हाण, राज्य असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष किशोर शिंदे, प्रतिनिधी राकेश सावे, निलेश पाटकर, पंच प्रमुख बापू समलेवाले, युवराज खटके, हिम्मत शिंदे, विजय बिराजदार, सचिन चव्हाण, बाळासाहेब माने, दिपक कांबळे, आक्रम मुजावर, गणेश सिंहासने, विजयकुमार शिंदे यांनी विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव संजय पाटील, सुत्रसंचलन राजेंद्र माने तर आभार प्रदर्शन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बापू समलेवाले यांनी केले.

Post a Comment

0 Comments