पंधरा वर्ष उलटून गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेच्या प्रतीक्षेत

जानेवारी २०२२ अखेर पर्यंत पुतळा बसविण्यात यावा; संभाजी ब्रिगेडची मागणी
जत/प्रतिनिधी: जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनेक वर्षापासुन बसविलेला नाही. सदर ठिकाणचे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आलेले आहे. सदरचा पुतळा जत शहराचे नावलौकिक वाढविणारा आहे. छ. शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा जानेवारी २०२२ अखेर पर्यंत बसविण्यात यावा. तसेच पुतळ्याच्या दोन्ही बाजुस रोडवर दुभाजक बसविण्यात यावेत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जत नगरपरिषद, उपविभागीय अधिकारीसो जत, तासिलदारसो जत, जत पोलीस ठाणे जत याना निवेदनाद्वारे करण्यात आले.
        जत मधील दिग्गज राजकीय नेते मंडळी यांच्या राजकीय श्रेयवादामुळे पुतळा स्थापनेच्या प्रतीक्षेत आहे. १७ लाख रुपये खर्चून जत नगरपरिषदेच्या वतीने चबुतरा बांधण्यात आला आहे. त्या चबुतरावर पुतळा बसवणार कधी असा सवाल शिवभक्तांकडून व जनसामान्यांकडून होत आहे. सदर पुतळा जानेवारी २०२२ अखेर पर्यंत न बसविल्यास संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमीकडुन तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
        यावेळी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, प्रमोद काटे जत शहर अध्यक्ष, खंडू शिंदे तालुका कार्याध्यक्ष, दिपक पाटणकर तालुका अध्यक्ष, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments