ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिपक केदार यांच्या विरोधातील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत; जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळेजत/प्रतिनिधी: चैत्यभूमी मुंबई येथे सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये काही समाजकंटकांनी गदारोळ घातला. यावेळी गर्दीला नियंत्रित करत असताना, भाई दिपक केदार यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पँथर सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष उर्फ भुपेंद्र कुमार कांबळे यांच्या नेतृत्वखाली जत उपविभागीय अधिकारीसो, प्रांत अधिकारीसो जत, जत पोलीस ठाणे जत यांना देण्यात आले.
         यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष अमर कांबळे, उपाध्यक्ष गिरीष सर्जे, कार्याध्यक्ष सुनिल कांबळे, सचिव विकी वाघमारे आधी जण उपस्थित होते.
         निवेदनात म्हटले आहे की, ६ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी मुंबई येथे आंबेडकर अनुयायी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्यने उपस्थित होते. मात्र यावेळी महानगर पालिका प्रशासनाने या ठिकाणी आलेल्या जनतेला कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती, या साठी शिवाजी पार्क खुले केले पाहिजे अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली होती. मात्र येथेच काही समाजातील विविध प्रकारच्या लोकांनी गदारोळ माजवला असताना केवळ एक समाज हितासाठी लढणाऱ्या भाई दिपक केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया पॅथर सेना च्या वतीने आंदोलन करण्यात येईल व याला शासन जबाबदार राहील.

Post a Comment

0 Comments