प्रकाश शिवाप्पा बंडगर यांना राज्य युवा व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार प्रधान । बंडगर बंधूची सराफ आणि जव्हेरी व्यवसाय-उद्योगात `प्रकाश 'मय वाटचाल"


जत/प्रतिनिधी : ए. जे. सोशल फौंडेशन, इचलकरंजी प्रस्तुत राज्यस्तरीय गुणीजन सुवर्णमोती सामाजिक, कला, साहित्य संमेलन २०२१ इचलकरंजी - कोल्हापूर यांच्या मार्फत मा.प्रकाश शिवाप्पा बंडगर रा.वळसंग ता.जत यांना राज्य युवा व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार मा. सागरजी कारंडे सिनेअभिनेते यांच्या हस्ते देण्यात आला. 
       यावेळी मा.आमदार निलेशजी लंके साहेब  मा. चैतन्य महाराज वाडेकर (युवा किर्तनकार)  सौ. सीमा इंग्रोळे (चेअरमन SDR फौंडेशन) कु. शिवानीताई देशमुख (महिला युवती अध्यक्ष राजे प्रतिष्ठान) मा. प्रमोद कुंडलीक पाटील (उद्योजक PP ज्वेलर्स) मा. बाबासाहेब पुजारी (संस्थापक/अध्यक्ष- जानकी वृद्धाश्रम) मा. चाँदबाशा जिगजिनी (शाखाप्रमुख मुस्लीम OBC ऑर्गनायझेशन) मा. अबोली जिगजिनी संस्थापिका अध्यक्षा :ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन, इचलकरंजी ए. जे. परिवार यावेळी उपस्थित होते.
       शेतीकामाची परंपरा लाभलेल्या कुटुंबांतील दोन तरुण वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत नवीन क्षेत्र धुंडाळतात. नवीन क्षेत्रासाठी तालुक्याचे ठिकाण गाठतात. पहिल्यांदा किराणा दुकान, नंतर सराफी व्यवसाय आणि आता गृहनिर्माण क्षेत्रात काम करत आहेत. उच्च दर्जाची सुविधा, ग्राहकांचा विश्वास, पारदर्शी व्यवहार आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची कला यामुळे व्यवसाय उद्योगाच्या क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमाविले आहे. ही कहाणी आहे, वळसंग येथील प्रकाश व चंद्रशेखर बंडगर या दोन भावंडाची. यांचा आणखी एक भाऊ डॉ. सुरेश हे अथणी येथे वैद्यकीय सेवेत आहेत. आपआपल्या क्षेत्रात प्रकाशमय वाटचाल करणारे हे तरुण उद्योग-व्यवसायातील नव्या पिढीसाठी व ग्रामीण भागातील होतकरु तरुणासाठी जणू ‘आयडॉल’ ठरावेत अशी त्यांची वाटचाल सुरू आहे.
         जतमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठेत, प्रकाश व चंद्रशेखर बंडगर यांची सराफी दुकाने आहेत. चंद्रशेखर बंडगर यांचे ‘मे. धानेश्वरी ज्वेलर्स’आहे. तर प्रकाश बंडगर यांची ‘मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफी आणि जव्हेरी’ही शोरुम आहे. चोख सोने व चांदीचे दागिने, वेगवेगळया डिझाइन्समधील उपलब्ध दागिने, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि पारदर्शक व्यवहार यामुळे बंडगार यांची सराफी दुकाने ही ग्राहकांची हक्काची आणि विश्वासाची ठरली आहेत. प्रत्येक व्यवसाय सचोटीने, प्रामाणिकपणाने, विश्वासाने करायचा ही त्यांची खासियत. सोबतीला ग्राहकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. या चतुसुत्रीवर त्यांनी अल्पावधीतच तालुक्याच्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली.
बंडगर भांवडे ही मूळची वळसंग येथील. वडील शिवाप्पा नागाप्पा बंडगर हे गावातील प्रतिष्ठित नागरिक. शेतकरी कुटुंब. त्यांनी ईमानेइतबारे आयुष्यभर शेती केली. वडिलोपार्जित शेती व्यवसाय सांभाळताना चंद्रशेखर, सुरेश आणि प्रकाश या तीन भांवडांनी वेगळी वाट चोखाळली. सुरेश वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. तर चंद्रशेखर आणि प्रकाश यांनी व्यापार-व्यवसायात मजल मारली आहे.
         सुरुवातीला त्यांनी जतमध्ये किराणा दुकान सुरू केले. होलसेल व किरकोळ स्वरुपात किराणा मालाचे दुकान उत्तमरित्या चालवित ग्राहकांचा विश्वास संपादन केला. किराणा व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी पुन्हा वेगळी वाट चोखाळली. सराफी व्यवसायात प्रवेश केला. मंगळवार पेठेत चंद्रशेखर व प्रकाश यांची स्वतंत्र अशी दोन दुकाने आहेत. ‘मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफी आणि जव्हेरी’मार्फत ग्राहकांना सोने खरेदीवर मोफत इन्शुरन्सची सुविधा दिली. ‘पीएसबी’ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी अक्षय तृतीय, दसरा, दिवाळी, गुढीपाडवासह विविध सणासमारंभाला वेगवेगळया ऑफर्स असतात. यामुळे सण उत्सव म्हटलं की या ठिकाणी सोने खरेदीला गर्दी असे जणू समीकरण बनले आहे. 
         ‘पीएसबी’ज्वेलर्समध्ये सोन्या-चांदीचे चोख व खात्रीशीर दागिने तयार व ऑर्डरप्रमाणे मिळतात. ‘जे ग्राहकांच्या मनात, तेच आमच्या दुकानात’याप्रमाणे ग्राहकांना सेवा देण्यावर भर असल्याचे ते सांगतात. प्रकाश बंडगर या तरुणांने सराफी दुकानासोबतच आता घरबांधणी क्षेत्रात पाऊल टाकले आहे. घरबांधणी व्यवसायातही ग्राहकांचे समाधान, दर्जेदार सुविधा यावर फोकस ठेवला आहे. ‘नव्या स्वप्नांची नवी चाहूल’ उरी बाळगत त्यांची वाटचाल सुरू आहे.

Post a Comment

0 Comments