जत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नामदार जयंत पाटील यांच्यावरील वादग्रस्त विधानाचा निषेध करतील का...? हेमंत खाडे जत तालुका सोशल मीडिया अध्यक्ष


जत/प्रतिनिधी: मा. प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली. याचा निषेध म्हणून जत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी निषेध करतील का...? अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका सोशल मीडिया अध्यक्ष हेमंत खाडे यांनी सोशल मीडिया वरून व्यक्त केली आहे.
           यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपाचे जतमधील राजकीय नेते मंडळी व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेब ह्याच्या बद्दल एकेरी भाषा वापरतात व पक्षाला "भ्रष्टवादी" असे संबोधतात तेव्हा जत राष्ट्रवादीचे नेतेमंडळी व पदाधिकारी कोणत्या बिळात असतात. तेव्हा साहेबांच्या वरचे प्रेम आदर व पक्षावरची निष्ठा दिसून येत नाही..? भाजपाच्या सोबतीने निवडणूक लढवली जाते हेच तर जत मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुर्दैव आहे. याचीच खंत वाटते, याची राष्ट्रवादीच्या जिल्हा व तालुका वरिष्ठ अध्यक्षांनी दखल घेणे गरजेचे आहे असे दिसून येते.
        जत राष्ट्रवादी मध्ये कोण आहे की नाही ही, मोठी शोकांतिका आहे. असेही ते शेवटी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments