इम्रान गवंडी यांना व्हीजे एनटी ओबीसी संघर्ष समन्वय समिती कडून जाहीर पाठिंबा

राष्ट्रवादीचे उमेदवार इम्रान गवंडी यांचा विजय निश्‍चित; रविंद्र सोलनकर


जत/प्रतिनिधी: कै. इकबाल (पट्टू) गवंडी माजी नगराध्यक्ष, जत नगरपरिषद जत यांचे निधन झालेने, त्या रिक्त जागेवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये पोट निवडणूक लागली आहे. त्या जागेवर कै. इकबाल (पट्टू) गवंडी यांचे सुपुत्र मा.इम्रान इकबाल(पट्टू) गवंडी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वास्तविक पाहता इम्रान गवंडी याना बिनविरोध निवडणे आवश्यक होते. पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवार उभा केला असल्यामुळे ही निवडणून बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये ही पोट निवडणूक लागली आहे. आम्ही ओ.बी.सी व्हजे एनटी संघर्ष समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी इम्रान इकबाल (पट्टू) गवंडी याना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करू व या निवडणुकीत भरघोस मतांनी त्याना विजयी करू. तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील सुज्ञ मतदार इम्रान गवंडी याना निवडून देतील असा विश्वास व्ही.जे. एन.टी. ओ.बी.सी. संघर्ष समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष रविंद्र सोलनकर यांनी यावेळी व्यक्त केला. 
         यावेळी ताय्यापा वाघमोडे सर पुरक निमंत्रक, पापा हुजरे तालुका समन्वय समिती, राजेंद्र आरळी सचिव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments