जत शहर पत्रकार गृहनिर्माण संस्थेतील गैरकारभाराच्या विरोधात पत्रकारांचे सांगलीत आंदोलनजत/प्रतिनिधी : जत शहर पत्रकार गृहनिर्माण संस्था बरखास्तीसाठी कृती समितीच्यावतीने जत शहरातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले आहेत.
        जत तालुक्यातील अनेक पत्रकारांनी जत शहर पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहार व अनागोंदी कारभाराबद्दल व संस्था बरखास्तीबाबत विविध शासकीय यंत्रणेकडे अर्ज केले आहेत. मात्र सदर अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे खालील मागण्यांसाठी पत्रकार मंगळवारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
        राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी मा. जिल्हाधिकारीसो, सांगली व मा. पोलीस अधिक्षकसो, सांगली यांना दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधितांवर अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात यावा, जत शहर पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या गैरव्यवहाराची अधीक्षक कार्यालय सक्षम अधिकारी नेमून चौकशी करून संस्था बरखास्त करावी व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, सहकार राज्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश देवूनही सदर चौकशी दडपणाऱ्या महसूल व सहकार विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जत शहर पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेविरोधातील सर्व तक्रारी अर्जाची चौकशी करून कारवाई करावी, खोटी माहिती देवून शासकीय भूखंड बळकावलेल्या सर्व बोगस पत्रकारांवर फौजदारी कारवाई करावी. नव्याने पुन्हा बोगस पत्रकारांना प्लॉट विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अध्यक्षावर शर्ती व अटी भंग केल्या प्रकरणी कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकर्त्यांनी केल्या आहेत.
        यावेळी या आंदोलनात दिनराज वाघमारे, श्रीकृष्ण पाटील, विजय नाईक, विठ्ठल ऐनापुरे, जॉकेश आदाटे, बी. पी. बुध्दसागर यांच्यासह अनेक पत्रकार सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments