भाविक भक्तांच्या उपस्थितीत डफळे राजघराण्याच्या वतीने जतच्या श्री यल्लमादेवीला नैवेद्य अर्पण

 

जत/प्रतिनिधी: हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत डफळे राजघराणेचा आज श्री. यल्लमादेवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला.
महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री . यल्लमादेवी यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.आज देविला नैवेद्य अर्पण करण्याचा मान डफळे राजघराणेचा असल्याने डफळे राजघराणेचे वंशज व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे,त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत अमृताराजे डफळे, युवराज श्रीमंत शिवांचलराजे व अनिरुध्द राजे, प्रतिष्ठान च्या सचिव श्रीमंत मासाहेब ज्योत्स्नाराजे डफळे यानी सहकुटुंब देविला पुरणपोळीचा मानाचा नैवेद्य अर्पण केला.
          यात्रेत आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. यात्रेत येणारे भाविक भक्तांसाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्याने या यात्रेत मर्यादित स्टाॅल लावण्यात आले आहेत. पंढरपूर येथिल सुप्रसिद्ध मेवामिठाईचे व्यापारी खंडागळे बंधू यांची दुकाने, फेरीवाले,तसेच हाॅटेल, भेळपुरी, सौंदर्य प्रसाधने, हळदी कुंकवाची व नारळाच्या दुकानाबरोबरच छोटी छोटी दुकाने उभारण्यात आली आहेत.
         यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे हे यात्रेकरूंना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
         यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था रहावी यासाठी बाहेरून मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. जतचे उपविभागीय अधिकारी श्री. जोगेंद्र कटारे, तहसिलदार श्री. जिवन बनसोडे, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. महेश वाघमोडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय बंडगर त्याच प्रमाणे श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे,प्रतिष्ठान च्या सचिव श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे आदी यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
        यात्रेचा उद्या किचाचा दिवस असून या दिवशी देविचे पुजारी श्री. सुभाष कोळी हे पहाटे देविची पालखी घेऊन डफळे सरकारांच्या राजवाड्यावर जातात या ठिकाणी डफळे राजघराणेचेवतीने देविची पालखी पुजा होऊन देविची खणानारळाने ओटी भरण्यात येते. त्यानंतर देविचे पुजारी पालखी घेऊन नगरप्रदक्षिणा घालतात व मानकरी यांची पाच घरे फिरून देविची पालखी दुपारी यात्रास्थळावर येऊन पालखी मंदिराची पाच प्रदक्षिणा करून किचाचे ठिकाणी गेल्यानंतर देविचे पुजारी श्री. सुभाष कोळी हे अग्नीकुंडात (किचात ) प्रवेश केल्यानंतर यात्रेची समाप्ती होते.
     तसेच यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी राजे रामराव काॅलेजचे एन.सी.सी.चे विद्यार्थी दर्शनासाठी भाविकानी कोरोनाचे नियम पाळत रांगेने दर्शन घ्यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे कार्यकर्ते अनिल शिंदे, मेजर सुनिल चव्हाण, मोहन चव्हाण, पापा सनदी, विश्वनाथ सावंत, गणपतराव कोडग, चंद्रकांत कोळी, महादेव कोळी, गणेश सावंत, मोहन माने- पाटील, संग्राम राजेशिर्के, अरूण उर्फ बारू शिंदे, श्रीकृष्ण पाटील, अमर जाधव, प्रा. कुमार इंगळे, कैलास गायकवाड आदी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यात्रेकरिता आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी धडपडताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments