जत नगरपरिषद प्रभाग क्र. ५ च्या पोटनिवडणुकीस राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रचारास शुभारंभ

इमरान गवंडी यांचा विजय निश्‍चित; सुरेशराव शिंदे

जत/प्रतिनिधी: जतचे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताठ तत्कालीन नगरसेवक स्वर्गीय इक्बाल गवंडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज राष्ट्रवादीने जत येथील चिंनगीबाबा चे दर्शन घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचारास सुरुवात करण्यात आली. इक्बाल गवंडी यांचे सुपुत्र इमरान गवंडी यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या ताकदीने ते या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी दुरंगी लढत लागली आहे. 
तर भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
        स्वर्गीय इक्बाल गवंडी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर इमरान गवंडी यांचा विजय निश्‍चित असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, प्रकाश माने, प्रमोद हिरवे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, अण्णा भिसे, सद्दाम अत्तर, मकसूद नगार्जी, सलीम मणेर, प्रकाश मोटे, बाळ सावंत, डॉ हैद्राबादे, हाजीसाब हुजरे, सलीम गवंडी, जनार्दन साळे, बसवराज चव्हाण, संतोष मोटे, अमोल साबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments