उमदी ता.जत येथे पत्रकार संघटनेची बैठक संपन्न विविध विषयावर चर्चा(जॉकेश आदाटे)/जत:  तालुक्यातील उमदी येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामीण पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी, पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन व जत तालुक्यातील पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव, ज्येष्ठ पत्रकार मलकारी वायचळ, तालुका अध्यक्ष दिनराज वाघमारे , उपाध्यक्ष विजय रूपनूर , राहुल संकपाळ, सचिव बादल सर्जे, खजिनदार सोमनिंग कोळी, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठल ऐनापुरे, रामन्ना सनाळे, राजू पुजारी, धनाप्पा कोहळी, यलगोडा कावडे, सतीश आजमाने, पांडुरंग कोळ्ळी , संजय ऐहोळी इत्यादी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments