जत एसटी आगारातील कर्मचारी बेमुदत संपावर ; प्रभाकरभाऊ जाधव व उमेश सावंत यांच्या उपस्थितीत आगाराप्रमुखाना निवेदन

 


जत/प्रतिनिधी: एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या विभागात विलीनीकरण करावे. शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती, वेतन भत्ते लागू करावेत व इतर मागण्यांसाठी पुन्हा आज ४ नोव्हेंबर पासून बेमुदत संपामध्ये सहभागी होत असल्याचे निवेदन जत एसटी आगारातील चालक-वाहक व इतर कामगारांनी आगारप्रमुखांना दिले. आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्राचे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी पुकारलेल्या संपाच्या नोटीस नुसार कर्मचारी सहभागी झाले.
       यावेळी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे प्रभाकर जाधव, नगरसेवक प्रकाश माने, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, नगरसेवक मिथुन भिसे, सूरज सगरे, किरण सगरे, शिवा माळी, सुरेश भिसे, नारायण कदम आदींनी पाठींबा दिला.
       जत आगार प्रमुखाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्राचे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अजयकुमार गुजर यांनी एसटी महामंडळ राज्य शासनकडे विलीनीकरनासाठी पुकारलेल्या संपाच्या नोटीस नुसार कर्मचारी सहभागी होत आहोत. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी होते तटपुंजे वेतन देत आहे.यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.दिलेल्या पगारातून मूलभूत गरजा भागविणेसुद्धा कठीण झाल्याने कर्मचारी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे नैराश्याने राज्यात जवळपास तीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे गंभीर पाऊल उचलले आहे.ही संख्या आणखी वाढत आहे.
तसेच राज्यातील इतर अनेक एसटी आगारांमध्ये कर्मचारी संपावर आहेत.संप असलेल्या आगारात एसटी गेली की या ठिकाणी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद बोलणे व शिवीगाळ केली जाते. यामुळे कर्तव्यावर असणाऱ्यांची मानसिकता बिघडते.यासाठी वरील सर्व प्रकार टाळण्यासाठी वेतन भत्ते व इतर सवलती लागू करून त्वरित देण्यात याव्यात. याकरता आम्ही सर्व कर्मचारी आजपासून संपात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर एकूण शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी एसटीच्या संघटनेच्या संपाला व मागण्याला आगाराप्रमुखानी पाठींबा दिला आहे. आपणही पाठींबा देण्याचे आव्हान यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी केले. हीच मागणी भाजपचे प्रभाकभाऊ जाधव व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी केली. यावेळी आगाराप्रमुख म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासन स्तरावर दिवाळीनंतर चर्चा होणार आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संप करू नये.

Post a Comment

0 Comments