जत येथे एक्स सर्विसमेन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मोफत रोग निदान शिबिरजत/प्रतिनिधी: जत तालुका एक्स सर्विसमेन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता विजापूर रोड येथील उमा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी या आरोग्य शिबीराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात बी.पी., शुगर तपासणी, रक्त तपासणी, डोळ्यांचे आजार तसेच स्त्रियांच्या कोणत्याही प्रकारच्या आजार तपासणी व निदान तज्ञ डॉक्टरांच्याकडून करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिक, वीरमाता, विरपत्नी व त्यांचे नातेवाईक यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच उपचार घेण्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा रुग्णांनीही या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9623032019 या मोबाईलवर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments