तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज; तुकाराम महाराज । सोन्याळ येथे फुलपिच क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
जत/प्रतिनिधी:- आजच्या स्पर्धेच्या काळात तरुणाई मोबाइल, सोशल मिडियामध्ये विश्व पाहत आहे त्याचा परिणाम व्हायचा तोच होत असून आरोग्यलयाबरोबरच सकारात्मक दृष्टीकोन नाहीसा झाला आहे. आजच्या या ताणतणावामध्ये शारीरिक व्यायाम काळाची गरज आहे तेव्हा तरुणाईनी मोबाइल विश्वातून बाहेर येत मैदानी खेळाकडे वळावे व स्वतःला तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
         जत तालुक्यातील सोन्याळ येथे एस. के. स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने फुलपिच क्रिकेट  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला उद्योगपती शंकर कुऱ्हाडे यांनी १७ हजाराचे प्रथम बक्षीस ठेवले आहे तर दुसरे बक्षीस प्रकाश चौगुले ११ हजार, तिसरे बक्षीस केराप्पा गरळे यांनी सात हजाराचे दिले आहे. या स्पर्धेसाठी तुकाराम बाबा महाराज यांनी स्वखर्चाने कायमस्वरूपी क्रिकेट मैदान तयार करून दिले आहे.
         या स्पर्धेचे उदघाटन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हणमंत शिंदे, नितीन शिंदे, गांधी चौगुले, धानाप्पा शिंगे, रफिक नदाफ, कुमार चौगुले, पृथ्वीराज शिंदे, महेश गाडीवडर, रवी शिंदे, रवी भरणे, भिमराया बिरादार, योगेश पांढरे आदी उपस्थित होते. 
        पूर्वी मैदाने गर्दीने फुललेली असायची पण आज मैदाने ओस पडली असल्याची खंत व्यक्त करत तुकाराम बाबा महाराज म्हणाले, आजची तरुणाई कुठे आहे हे दुर्देवाने शोधावे लागत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही तरुणाईने स्वतःचे ध्येय निश्चित करून वाटचाल करावी. ज्ञान, विज्ञान व अध्यात्म याची सांगड घालून तरुणांनी ध्येय गाठावे असे आवाहन केले.
तुकाराम बाबांनी दिले मैदानाला रूप-
सोन्याळ येथील तरुणांना खेळण्यासाठी मैदान व्यवस्थित नव्हते. तुकाराम बाबा महाराज यांनी स्वखर्चातून मैदान तयार करून दिले. या मैदानावर उदघाटनानंतर तुकाराम बाबा यांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

Post a Comment

0 Comments