स्त्रीभ्रूण हत्या कायद्याने गुन्हा; अॅड. अमृता यादव

गर्भपात केल्यास पतीसह डॉक्टरांनाही शिक्षा


प्रतिनिधी: स्त्रीभ्रूण हत्या हा कायद्याने गुन्हा असून, मुलगी आहे म्हणून गर्भपात केल्यास पतीसह डॉक्टरांना शिक्षा होते. विशिष्ट परिस्थितीतच कायदा गर्भपाताला परवानगी देऊ शकतो. जर गर्भाची नीट वाढ झाली नसेल किंवा आईच्या जीवास धोका होऊ शकत असेल तरच गर्भपाताला कायदा परवानगी देऊ शकतो. मात्र केवळ मुलगी आहे म्हणून गर्भपात करता येत नाही, असे प्रतिपादन अॅड. अमृता यादव यांनी केले.
        हसूर (ता. शिरोळ) येथे तालुका विधी सेवा समितीमार्फत शिबीर झाले, त्यावेळी अॅड. यादव बोलत होत्या. यानंतर विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांना असणाऱ्या सोयी व सवलतींची माहिती दिली. आई-वडिलांना सांभाळणे हे मुलांना कायद्याने बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिरास जयसिंगपूर कोर्टातील कर्मचारी तराळ मॅडम, हसुर गावचे महिला, ग्रामपंचायत सदस्य अभिजित व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

2 Comments

  1. Keept up hon.Adv.Amruta ji..thnaks for shearing best knowledge for society..👍👍👍

    ReplyDelete
  2. Thnaks for creating awareness in society Great adv amruta ji .keept up :Mohan

    ReplyDelete