महाराष्ट्रात कुस्ती मैदाने भरविण्यास परवानगी द्या; जत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवेदन; आंदोलनाचा इशाराजत/प्रतिनिधी : जत तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात कुस्ती मैदाने भरविण्यास परवानगी द्यावि अश्या मागणीचे निवेदन जत तहसीलदार श्री शेट्यापगोळ याना देण्यात आले आहे.
         निवेदनात म्हटले आहे की, गेले दीड वर्षापासुन कोरोना महामारीमुळे कुस्त्यांची मैदाने बंद पडली आहेत. सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. आता अनेक खेळांना परवानगी देण्यात आल्या आहेत. मात्र कुस्ती मैदानाला अद्याप परवानगी दिली नाही. मैदाने बंद असल्यामुळे त्यांना मिळणारा खुराकही आता बंद झाला आहे. अनेकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. अनेक पैलवान कुस्ती सोडुन आता रोजंदारीवरती कामाला जात आहेत. ही अवस्था दुर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कुस्त्यांची मैदाने भरविण्यास परवानगी द्यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद आहे.
          यावेळी हेमंत खाडे, सागर शिनगारे, पवन कोळी व राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments