संभाजी ब्रिगेडच्या वतिने किल्ले बाणूरगड येथे दिपोत्सव सोहळा संपन्नजत/प्रतिनिधी: संभाजी ब्रिगेड जत आयोजित भव्य दिपोत्सव सोहळा किल्ले  बाणूरगड ता.खानापूर येथे स्वराज्याच्या मावळ्यांनी दिलेल्या लढ्याची कृतज्ञतापूर्वक आठवण आपल्या सुख दुःखात नेहमीच संघर्ष व प्रेरणादायक ठरत असते. हेच उदाहरण म्हणून शत्रुच्या प्रत्येक हालचाली बारकाईने व गनिमिकावा पद्धतीने स्वराज्याच्या उभारणीसाठी आपला जीव ओवाळून टाकणारे शिवरायांचे सच्चे शिलेदार हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी आपलं स्वराज्य अभेद्य ठेवलं, आज त्यांच्यामुळे सुखाने जगतो त्यांच्या पवित्र अश्या बाणूरगड समाधी स्थळी आपल्या दिवाळी सणाचा पहिला दिवा लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच यावर्षी पासून प्रत्येक वर्षी बाणूरगड येथे दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी सांगितले. यावेळी बापुसो शिंदे, अॅड.मदन नाईक, संदिप नाईक, शरद वाले, संदिप शिंदे, पाडुरंग शिंदे, श्रेणिक नाईक, ओंकार शिंदे, प्रथमेश शिंदे, परमेश्वर कारंडे, प्रकाश गायवाड व असंख्य शिवप्रेमी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments