नगरसेविका वनिता साळे यांच्या पाठपुराव्याला यश। पाणीपुरवठ्याची पाईपलाईन बदलण्यासाठी खेचून आणला निधी


जत/प्रतिनिधी; जत शहरातील प्रभाग क्रमांक एक विठ्ठलनगर मधील नगरसेविका सौ वनिता साळे यांनी प्रभागातील मुख्य जलवाहिनी बदलण्या संदर्भात जत नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला आज यश आल्याचे दिसत आहे. 
          सौ साळे यांनी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन खराब झालेली असून याठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी पाणीपुरवठ्याची पाईप लाईन दुरुस्ती बाबत वारंवार निवेदनाद्वारे मागणी केली होती. या ठिकाणी प्रभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची पाईप लाइन देखील नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे. तरी या ठिकाणी गांभीर्याने विचार करून पाईपलाईन बदलण्यात यावी यासंदर्भात लेखी निवेदन त्यांनी नगरपरिषदेस दिले होते. 
         त्यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून सुमारे ३१ लाख रुपयाचे पाईपलाईनचे काम विठ्ठलनगर प्रभाग क्रमांक एक येथे युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments