जत येथे अज्ञात चोरट्याकडून गोडावून फोडून २२ लाखाचा मुद्देमाल लंपासजत/प्रतिनिधी: जत शहरातील राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवारातील कृषी सेवा केंद्राचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २२ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
        अधिक माहिती अशी की, जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गा लगत बाजार समितीच्या गाळ्यासमोरील साईराम कृषी सेवा केंद्राचे मार्केट यार्डातील गोडावन आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी गोडावूनच्या भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. आतून शटरचे कुलूप तोडून आतील विविध औषध कंपन्याचे २२ लाख रूपये किंमतीचे ४७ बॉक्स लंपास केल्याचे समोर आले आहे. जत पोलीसांना यांची कल्पना देण्यात आली आहे. एक अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत . शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झालेली चोरी पोलीसांना आवाहन ठरली आहे.

Post a Comment

0 Comments