पत्रकार अनिल मदने यांच्याकडून माणुसकीचे दर्शनजत/प्रतिनिधी: पत्रकार अनिल मदने हे नित्य नेमप्रमाणे आज सकाळी सायकलिंग साठी घराबाहेर पडले, यावेळी जत-येळवी रस्त्याने ते जात असताना काही अंतरावर गेल्यावर ते व्यायाम करण्यासाठी थांबले असता त्यांना रस्त्या कडेला असलेल्या झुडपात मोबाईलच्या गाण्यांचा आवाज आला. यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्यांना एक अनोळखी मोबाईल दिसुन आला. या मार्गावर परिसरातील अनेक नागरीक रोज पहाटे व्यायामासाठी येत असतात. यावेळी मदने यांनी मोबाईल पडलेल्या ठिकाणी थांबून काही नागरिकांकडे विचारपूस केली असता हा मोबाईल विठ्ठल नगर येथील व्यावसायिक शंकर मराठे यांचा असल्याचे कळाले. काही वेळाने शंकर मराठे हे तेथे आले व अनिल मदने यांनी त्यांचा महागडा मोबाईल त्यांना प्रामाणिकपणाने परत केला. या गोष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments