शुक्रवार पर्यंत जत शहरासह परिसरातील नऊ फिटरचा विध्दूत पुरवठा पुर्ववतजत/प्रतिनिधी: जत येथिल मुख्य विजवितरण प्रणालीतील पाॅवर ट्रान्सफार्मर बंद पडल्याने जत शहरासह नऊ फिटरचे काम बंद असून नागरिकांचे मोठे हाल सूरू आहेत. बंद पडलेल्या ठिकाणी नविन पाॅवर ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यासाठी विजवितरण कंपनीला शुक्रवार पर्यंत कालावधी लागणार असून त्यानंतर जत शहरासह परिसरातील नऊ फिटरवरून विद्धूत पुरवठा पुर्ववत होईल अशी माहीती महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी चे जत येथिल अधिकारी माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, जत येथिल म.रा.वि.वि.कंपनीकडील मुख्य विज वितरण पाॅवर ट्रान्सफार्मर अचानक बंद पडला आहे. या मुख्य ट्रान्सफार्मरवर जत शहरासह नऊ फिटर कार्यान्वित होते. परंतु अचानक मुख्य ट्रान्सफार्मर बंद पडल्याने आमची तारांबळ उडाली आहे. 
        आम्ही जत शहरातील विध्दूत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करित आहोत. यासाठी आम्ही जत शहरासाठी पाच्छापूर, डफळापुर, धावडवाडी आदी ठिकाणाहून विजजोडणी करून जत शहरातील विध्दूत पुरवठा सुरू करण्यासाठी रात्रंदिवस काम करित असून यामध्ये आम्हाला म्हणावे तसे यश येत नाही. जत येथिल मुख्य विज वितरण पाॅवर ट्रान्सफार्मर आम्ही कराड जवळील एम.आय.डी.सी.येथून मागवला असून तो आज मंगळवारी दुपारपर्यंत जतला येईल. तत्पूर्वी जूना बंद पडलेला मुख्य विज वितरण पाॅवर ट्रान्सफार्मर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते काम लवकरच संपेल. 
        त्यानंतर कराडहून आणलेला मुख्य विज वितरण पाॅवर ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी व त्याची ट्रायल घेण्यासाठी शुक्रवार पर्यंत कालावधी लागणार असून त्यानंतर जत शहरासह परिसरातील नऊ फिटरचा विध्दूत पुरवठा पुर्ववत सुरू होणार आहे. विध्दूत ग्राहकानी जत शहरासह परिसरातील नऊ फिटरचा विध्दूत पुरवठा जो पर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत विजेचा अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन ही माळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments