जत येथील कुंभार कुटुंबीयांकडून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वस्तीगृहातील मुलींना मदतजत/प्रतिनिधी: जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी आज त्यांच्या पूनम उर्फ  गौरी हीचा वाढदिवस मोठा डामडौल न करता जत येथिल भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मधिल मुलींना शालेय साहित्य व मिठाई वाटून अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. 
        जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार व त्यांचे पती शिवनगर गणेशोत्सव व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते  चंद्रकांत उर्फ पापा कुंभार हे त्यांच्या मुलींचा पूनम उर्फ गौरी हीचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु यावर्षी कुंभार कुटुंबियानी असा निर्णय घेतला की, आपली मुलगी गौरी हीचा वाढदिवस जत येथिल भगिनी निवेदिता मुलींच्या वस्तीगृहात साजरा करायचा त्या दृष्टीने त्यानी आज येथिल भगिनी निवेदिता मुलींच्या वस्तीगृहात जाऊन गौरीच्या हस्ते वस्तीगृहातील मुलींना शालेय साहीत्याचे वाटप केले व मिठाई ही दिली. यावेळी मुलीनीही गौरीला टाळ्या वाजवत व वाढदिवसाचे गाणे म्हणत आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या. 
         याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी भगिनी निवेदिता मुलींच्या वस्तीगृहात मुली गेले दोन दिवस झाले देवगिरी येथिल किल्ल्याची जी प्रतिकृती तयार करित आहेत त्या किल्ल्यावर खेळणी विकत घेण्यासाठी मदत दिली. 
         यावेळी भगिनी निवेदिता मुलींच्या वस्तीगृहाच्या अधिक्षिका रेखा मुळे, ललिता बनसोढे, सुजाता पाटील, निता जाधव, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, सौ.शारदाताई कुंभार, प्रसाद जेऊर, श्रीकृष्ण पाटील, गौरी जेऊर, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments