जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी; मा.प्रकाश जमदाडे


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच थकबाकीच्या नावाखाली महावितरणाच्या अधिकन्याकडून अनाधिकृतपणे ट्रान्सफॉर्मरच बंद केला जात आहेत. हे त्वरित थांबवण्यात यावे या मागणीचे निवेदन सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे चौगुले याना दिले यावेळी मोहन भैय्या कुलकर्णी उपस्थित होते.
       दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका कायम दुष्काळी भाग आहे. गेल्या ४-५ वर्षापासून द्राक्षपीक नगदी पीक झाले आहे. जवळपास ६५०० एकर क्षेत्र आज द्राक्ष लागवडी खाली आहे. येथिल द्राक्षे पूर्ण देशभर बेंगलोर, विशाखापटटणम, कलकत्ता, दिल्ली इ. मोठ्या शहरात जात आहेत. तसेच अनेक शेतकरी बेदाणा (सुका मेवा) बनवत आहेत. परदेशातही बेदाणा निर्यात होतो. त्यामुळे द्राक्षपीक हा उदयोग निर्माण झाला आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून अवकाळी पावसाने घड कुजणे, घडाची गळ होणे व दावण्या रोग यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी पचनामे करून शेतकन्यास नुकसान भरपाई दयावी.
       गेल्या ४-५ दिवसापासून थकबाकीच्या नावाखाली महावितरणाच्या अधिकन्याकडून अनाधिकृतपणे ट्रान्सफॉर्मरच बंद केला जात आहे हे अन्यायकारक आहे. जे शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांचे वीज तोडण्यास आमची हरकत नाही परंतू ट्रान्सफॉर्मरची वीज तोडू नये असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments