जत शहरातील नामांकीत सराफ व्यवसाईकाकडून लकी ड्रॉ योजनेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूकजत/प्रतिनिधी: जत येथिल सराफ व्यवसाईक यांच्याकडून लकी ड्रॉ योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक. दिवाळीनिमित्त जत शहरातील नामांकीत सराफ व्यवसाईक यानी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लकी ड्रॉ योजना काढली असून या योजनेमध्ये मोठमोठी बक्षिसे जाहीर केली आहेत. 
        जत शहरासह तालुक्यातील गावोगावी या सराफ व्यवसाईकांनी लकी ड्रॉ चे मोठमोठे प्लेक्स लावून मोठी जाहीरातबाजी केली आहे. या जाहीरातबाजीमुळे तालुक्यातील ग्राहक सोने व चांदी खरेदी करण्यासाठी या सराफ पेढ्यांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. लकी ड्रॉ मध्ये आपणाला कोणतेतरी बक्षिस मिळेल या अपेक्षेने अनेक ग्राहकानी या नामांकित सराफ पेढीमधून सोन्याचे, चांदीचे दागीने खरेदी केले. रूपये दहाहजारचे सोन्याचे दागीने व रूपये पाचहजाराचे चांदीचे दागीने खरेदी करणारांना कुपन देऊ अशी मोठमोठी जाहीरातबाजी करणारे या नामांकित सराफ पेढीमधून रूपये पंचवीस हजाराचे सोन्याचे दागीने खरेदी करणारे या ग्राहकांने केवळ बावीस कॅरेटची पिळयाची अंगठी खरेदी केले म्हणून त्यांना लकी ड्रॉ योजनेचे कुपन दिले नाही. 
        जत शहरातील नामांकीत सराफ व्यवसाईक असलेल्या या व्यवसाईकांकडून लकी ड्राॅ योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक चालू असून या व्यवसाईकांकडून लकी ड्राॅ च्या जाहीरातीवर दहाहजार रूपयाचे सोने व पाचहजार रूपयांच्या चांदी खरेदीवर आकर्षक अशी बक्षिसे असलेल्या लकी ड्रॉ ची जाहीरातबाजी सुरू केली असून लकी ड्रॉ चे कुपन मिळण्याच्या अपेक्षेने या नामांकित सराफ पेढीमधून सोने खरेदी करणारे ग्राहकांची मोठी फसवणूक झाल्याची चर्चा जत शहरामध्ये सुरू आहे.

Post a Comment

0 Comments