संखमध्ये शुक्रवारी कौशल्य आधारित शेतकरी व शेतमजूर प्रशिक्षणाचे आयोजन । डाळिंब तज्ञ डॉ. बी.टी. गोरे यांचे व्याख्यान; तुकाराम बाबा महाराज यांची माहितीजत/प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व संख डाळिंब उत्पादक शेतकरी स्वयंसहायता गट यांच्या संयुक्त विद्यमाने संख येथील बाबा महाराज मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कौशल्य आधारित शेतकरी व शेतमजूर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात डाळिंब तज्ञ डॉ. बी.टी. गोरे यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
          या कार्यक्रमात डाळिंब तज्ञ डॉ. बी.टी. गोरे यांचे डाळिंब पेन हॉल बोरर व डाळींब मर रोग या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास आत्माचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक मनोजकुमार वेताळ,  तालुका कृषी अधिकारी हणमंतराय मेडीदार, तुकाराम बाबा महाराज यांच्यासह सरपंच व सर्व शेतकरी बांधव प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
         शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज, कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री संत बागडेबाबा  मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व संख डाळिंब उत्पादक शेतकरी स्वयंसहायता गट यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments