समाज बांधवांच्या समस्या अधिवेशनात मांडणार: आमदार विक्रामसिंह सावंत
जत/प्रतिनिधी: महापुरुष व संत महात्मे यांच्या जयंती निमित्ताने समाज बांधवांना त्यांच्या कार्याची माहिती व्हावी. तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात निर्माण केलेला आदर्श आपल्या जीवनात यावा यासाठी जयंती साजरी करणे हा चांगला उपक्रम आहे. जत तालुक्यातसुद्धा कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या अनेक समस्या असून त्यापैकी पूर्वीप्रमाणे महादेव कोळी समाज दाखले मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही आमदार विक्रामसिंह सावंत यांनी दिली.
जत तालुका आदिवासी महादेव कोळी समाज उत्सव समितीच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार सावंत बोलत होते. कार्यक्रमाला माजी नगरसेवक महादेव कोळी, बाळासाहेब कोळी, आन्नुप्रभू कोळी, साताप्पा कोळी, कृष्णा कोळी, नरेंद्र कोळी, पत्रकार सोमनिंग कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. जेष्ठ नेत्या विमलताई कोळी, आन्नुप्रभू कोळी, बसाप्पा कोळी यांचे सत्कार आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. तर अशोकराव बनेन्नवर, निगडीचे सरपंच वैभव कोळी, पाच्छापुरचे सरपंच महेश कोळी, रावसाहेब मंगसुळी यांचेही सत्कार उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी आमदार विक्रामसिंह सावंत पुढे म्हणाले की, कै. रावसाहेब कोरे यांनी जिल्ह्यातील अनेक कोळी समाज बांधवांना एकत्रित केले. त्यांच्या अडचणी जाणून घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच कोळी समाज बांधवासाठी सामाजिक सभागृह लवकरच मंजूर करण्याची घोषणा आमदार सावंत यांनी केली.
0 Comments