ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या तरुण पिढीचे उत्तम मार्गदर्शक बनावे; दिनकर पतंगेजत/प्रतिनिधी: 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नुतन तहसीलदार जिवन बनसोडे यांच्या उपस्थितीत जत तहसील कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी नवीन तरुण पिढीला चांगले मार्गदर्शन करावे व त्यांचा मोठा आधारस्तंभ बनावा असे प्रतिपादन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तहसीलदार यांचे हस्ते सर्व जेष्ठ नागरीकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या साठी नवीन योजना व नवीन सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही नूतन तहसीलदार जिवन बनसोडे यांनी या वेळी बोलताना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी केले.

       यावेळी बिसले गुरुमुर्ती जेऊर सर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, एम आर पाटील सर सेवानिवृत्त नायब तहसीलदार, सुलतान नदाफ माने पाटील, देसाई सर, काटकर सर, जेष्ठ नागरिक पत्रकार बंधु व महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार दिनकर पतंगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments