जत शहरातील विठ्ठलनगर येथे टीव्हीच्या शॉर्ट सर्किटने आग २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसानजत/प्रतिनिधी: जत शहरातील विठ्ठलनगर येथे राहत्या घरातील दूरचित्रवाणी संच शॉर्ट सर्किट होऊन संसारउपयोगी साहित्य सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. विठ्ठलनगर येथील शकील शेख यांच्या घरात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. जतचे तलाठी रवींद्र घाटगे, कोतवाल सुभाष कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
        या बाबतची अधिक माहिती अशी की, शकील शेख हे आपल्या कुटूंबियांसोबत विठ्ठलनगर येथे राहत आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी बांधकाम कामासाठी ते घराबाहेर गेले होते. तर पत्नीही कामासाठी बाहेर गेली होती. घरात शेख यांची लहान मुले टी. व्ही. पाहत बसले होते. यावेळी अचानक टी. व्ही. मध्ये शॉर्ट सर्किटने धूर निघू लागला. धुराचे रूपांतर हळूहळू आगीत झाले. अचानक लागलेली आग पाहताच मुलांनी घराबाहेर येत आरडाओरड सुरू केली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. ही माहिती कळताच जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे, युवक नेते भीमराव देवकर, समाजसेवक सिद्धेश्वर जाधव, सिद्धू बुरुटे, लखन देशमुख, पांडुरंग सुर्यवंशी,राजू जाधव, सार्थक देवकर,विकास बनपट्टे, आनंद कांबळे, निखिल पाखरे, चंद्रकात डोबाळे, सैरभ देवकर व जागर फाऊंडेशनच्या टीमने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये टी व्ही, फ्रिज, कपड्याचे कपाट, रोख रक्कम, संसार उपयोगी भांडी व साहित्य जळून खाक झाले आहे.


उपनगराध्यक्ष पवार यांच्याकडून शेख कुटूंबियांना मदतीचा हात-
विठ्ठलनगर येथील शेख कुटूंबियांचे विजेच्या शॉर्ट सर्किटने घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी त्यांनी भेट दिली. शेख कुटूंबियांना आवश्यक संसारउपयोगी व  किराणा साहित्याची मदत केली आहे. तसेच शासकीय विभागाकडे पाठपुरावा करून शेख कुटूंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी  सांगितले. यावेळी युवक नेते रुपेश कांबळे, संतोष देवकर, बशीरभाई शेख, उत्तम पाथरुट आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments