डाळींब पिकावरील बिब्या व कुजव्या रोगानी शेतकरी हैरान

 डाळींब पिकावरील बिब्या व कुजव्या रोगानी शेतकरी हैरान; शेतकरी कर्जबाजारीत वाढ 


जत/प्रतिनिधी: दुष्काळी जत तालुक्यातील अगदी माळरानावर व अल्प पाण्यावर येथील शेतकरी वर्ग डाळिंबाची बाग वर्षभर विकतचे पाणी आणून जगवल्या परंतु आत्ता या वातावरणामुळे कुजव्या व बिब्या या रोगाने पूर्णपणे डाळींब बागावर फैलाव झाले असल्याचे चित्र या दुष्काळी जतपुर्व भागात दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात कर्ज कसे फेडायचे या चिंतेत आहे. डाळींब बागा निकामी होत असल्याचे पाहून शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
         जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून जत तालुका ओळखला जातो. तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळ असल्याकारणाने या भागातील शेतकरी अल्प पाण्यावर अगदी पाण्याचे काटेकोरपणे पालन करून ठिबक सिंचनाद्वारे व शासनाचे शेततलाव या माध्यमातून डाळिंब बागा जत पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केले आहे. परंतु दोन वर्षापासून या पूर्व भागात बऱ्यापैकी उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आता सध्या या पूर्व भागामध्ये अल्प पाण्यावर गेले वर्षभर विकतचे पाणी आणून डाळिंब बागा जगवल्या जत होते. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे व परतीच्या पाऊसामुळे सदर फळ झाडांवर कुजव्या व बिब्या (कयार)काळे डाग दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सदर डाळिंब बागा वरती अनेक औषध उपचार करत आहे. त्यामुळे या पूर्व भागातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. डाळिंब बाग लावण्यासाठी छाटणीसाठी व औषधोपचारासाठी हजारो लाखो रुपये शेतकरी वर्गाने खर्च केले आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाने सोसायटीमार्फत तसेच सावकाराकडून उसनवारी व व्याजाने पैसे घेऊन डाळिंब बागा जगवत होते. परंतु या वातावरणामुळे सदर डाळिंब बागावरती कुजव्या व बिब्या ह्या रोगाने अनेक बागा निकामी होत चालल्या आहेत.

Post a Comment

0 Comments