जत डफळापुर मार्गावर दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमीजत/प्रतिनिधी : जत - डफळापूर मार्गावरील चौथा मैल येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अशोक पांढरे (रा. कुडणूर), सजोत संजय नाथ (रा. डफळापूर) असे गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल नव्हता.
         घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरूरमधून जखमी अशोक पांढरे, श्रींकात चौगुले, विनायक चौगुले हे तिघे मुंचडी येथील दरेश्वर देवाच्या दर्शनासाठी चालले होते. तर सजोत संजय नाथ, इजाज शौकत जमखंडीकर, चव्हाण असे तिघे जतहून डफळापूकडे येत होते. दोन्ही दुचाकीची समोरासमोर भिषण धडक झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
         तर चौघे किरकोळ दुखापत झाली आहे. यातील दोघाची प्रकृत्ती चिंताजनक असून त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. जत पोलीसाचे पथकांने घटनास्थळी भेट दिली असून जखमीचे जबाब घेण्यासाठी पोलीस मिरजेला रवाना झाले आहेत.


Post a Comment

0 Comments