राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्रुती तांबे हिचे यश


घोलेश्वर ता.जत (तांबे वस्ती) येथे श्रुती तांबे हिचा सत्कार करताना आ. गोपीचंद पडळकर विचार मंचाचे सदस्य

जत/प्रतिनिधी: आ. गोपीचंद पडळकर विचार मंचाच्या वतीने राज्यस्तरीय ऑन लाइन निबंध स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत जत तालुक्यातील घोलेश्वर (तांबेवाडी) येथील श्रुती उर्फ मयुरी बाळासाहेब तांबे हिने यश संपादन करत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
     आ. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑन लाईन निबंध स्पर्धचे आयोजन केले होते. समाजबांधवाच्या व्यथा यातून जाणून घेणे, समाजाबद्दलची माहिती नव्या पिढीला व्हावी हाच यामागचा उद्देश होता. या स्पर्धेत राज्यभरात पाचशेहुन अधिक जणांनी सहभाग घेतला होता.
घोलेश्वर (तांबेवाडी) येथील श्रुती उर्फ मयुरी बाळासाहेब तांबे हिने 'मेंढपाळ बांधवांचे जीवन' यावर निबंध लिहला. या निबंधाने राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला. श्रुती तांबे हिच्या या यशाचे कौतुक करत आ. गोपीचंद पडळकर विचार मंचचे सदस्य हणमंत राजगे, लिंबाजी खरजे,  सचिन पडोळकर, परशुराम गुगवाड, म्हाळाप्पा कोट, कोटनुळे, हणमंत खरात, प्रतिक कोळी यांनी सत्कार केला. यावेळी सैनाप्पा तांबे, बाळासो तांबे, वैशाली तांबे, भिमराव तुराई,  गणेश तांबे, मल्हारी तांबे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments