बागेवाडीतील सौ.नंदा दिलीप जाधव कुटुंबियांचे उपोषण अखेर मागे; तहसीलदारांकडून कार्यवाहीचे लेखी पत्रजत/प्रतिनिधी: जमिनीच्या चुकीच्या हिस्सेफोडबाबत बागेवाडीचे तत्कालीन तलाठी व डफळापूरचे मंडळअधिकारी यांची चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी सौ.नंदा दिलीप जाधव रा.बागेवाडी(ता.जत) यांनी केली होती. या मागणीचा प्रशासनाने निर्णय दिला नसल्याने जाधव कुटुंबियांनी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शुक्रवारपासून सुरू केले. शनिवार दि.२ ऑक्टोबरचा उपोषणाचा दुसरा दिवस होता. दुपारी तीन वाजता तहसीलदार जीवन बनसोडे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. मात्र लेखी पत्रावर उपोषणकर्ते ठाम राहिले. शिवाय उपोषण कर्त्यांनी महात्मा गांधी जयंती उपोषणस्थळी साजरी केली.
         दरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या स्वाक्षरीच्या आश्वासनाचे लेखी पत्र शनिवार दि.२ रोजी रात्री साडेसात वाजता दिल्याने अखेर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी महसूल विभागातील जेलर सुलाने, नितीन शिंगाडे, तलाठी हणमंत बामणे, कोतवाल सुभाष कोळी यांच्यावतीने लेखी पत्र उपोषणकर्त्याना दिले. तहसीलदारांनी उपोषणकर्ते सौ.नंदा दिलीप जाधव यांना दिलेल्या या लेखी पत्रात म्हटले आहे की, गट नं १११मधील वादातीत जमिनीचे उपविभागीय अधिकारी यांनी नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. हे पत्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्याना दिले. त्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणास दिलीप जाधव, प्रवीण जाधव, ऋतुजा जाधव सहभागी झाले होते. काल उपोषणकर्त्यांना प्रांताधिकारी यांनी आश्वासन दिले. मात्र ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नव्हते. अखेर तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या स्वाक्षरीच्या आश्वासनाचे लेखी पत्र शनिवार दि.२ रोजी रात्री साडेसात वाजता माळ्यावर उपोषण मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments