जत येथील आशा स्वयंसेविकांचे नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन;अखेर मागण्या मान्य। आशा स्वयंसेविकांना दिवाळी भेट

 


जत/प्रतिनिधी: जत नगरपरिषद समोर आशांचे थकित कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा याबाबत थाळीनाद आंदोलन करण्यात येणार होते. पण जत नगरपरिषद चे मुख्याधिकारी कार्यकारी महेश वाघमोडे साहेब यांनी आशा स्वयंसेविका पदाधिकाऱ्यांना बोलून चर्चा केली. कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता १० महिण्या पैकी ५ महिण्याचे कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी कबूल केले. क्षणाचा विलंब न करता मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून चेक काढण्याचे आदेश दिले. जत शहरामध्ये ३३ आशा स्वयमसेविका आहेत. त्या या दोन वर्षापासून कोरोना च्या महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत म्हणून शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर म्हणजे नगरपरिषद च्या वतीने कोरोना कामासाठी म्हणून दर महिण्याला १००० प्रोत्साहन भत्ता देयचे आहे जत नगरपरिषद ने नोव्हेंबर २०२० या महिन्या पर्यंत कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता दिला गेला आहे.
       आजच्या बैठकीत थकित दहा महिन्यांपैकी पाच महिन्याचे थकित मानधन चा चेक आज बँकेत जमा केला. यावेळी जत नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष आप्पा पवार, अशोक बन्नेनावर, कॉ हणमंत कोळी, आशा स्वयम सेविका ललिता सावंत, रेश्मा शेख, सुजाता कवठे, लता मदने व इतर सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
       या निर्णयाचा सर्व आशा स्वयंमसेविकांनी जत नगरपरिषद चे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांचे आभार मानले. या आंदोलनास भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत, युवा नेते संतोष मोठे यांनी पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments