निराधार योजनेची पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करा;जत राष्ट्रवादीच्या वतीने निवेदनजत/प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जतचे वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, अपंग व्यक्तींच्या पेन्शन योजना, विधवा महिलांच्या पेन्शन योजना या संबंधिचे निवेदन जत नायब तहसीलदार मुलाणी साहेब यांचे कडे सादर करण्यात आले.
         मागील ३ ते ४ महिन्यांपासून जत येथील लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेची पेन्शन मिळालेली नाही. या बाबींकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. आणि ते त्यांनी द्यावे व संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची ही पेन्शन लवकरात लवकर मिळावी, ही मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. 
         यावेळी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, जत एकात्मिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शिनगारे, विजय फडतरे, मांतेश जंगम, दत्ता बिराजदार, सचिन पांढरे आदी जण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments