जत/प्रतिनिधी: जत तालुका विधी सेवा समिती जत तर्फे जत पंचायत समिती, जत येथे मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे निर्देशाप्रमाणे दिनांक २ ऑक्टोबर २०२१ से १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांचेकडून मिळणा-या विविध सेवा विषयींबाबतचे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करणेत आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए को चौगलेसाहेब हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जत तालुका विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर डी कदम वकील यांनी केले व सदर विषयावर विधिज्ञ एस. बी. सौदागर वकील व जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए.को. चौगलेसाहेब, सह-दिवाणी न्यायाधीश ए.बी.जाधवसाहेब यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विधिज्ञ बी. वाय. गडटे हे हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साळुंखे यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.
0 Comments