सख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू, उमराणी ता.जत येथील घटनाजत/प्रतिनिधी: उमराणी ता.जत येथे आई समवेत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहीण-भावाचा उमराणी गावालगत असलेल्या सिंदूर रस्त्यावरील कुराण पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी चार वाजता घडली आहे. कु.सुप्रिया बाबू यादव (वय १४) व अभिजित बाबू यादव (वय १२) असे मृत झालेल्या बहिण भावाचे नावे आहेत. अभिजित हा इयत्ता सहावी मध्ये शिकत होता, तर तिची बहीण सुप्रिया ही आठवी मध्ये शिकत होती. रविवार शाळेला सुट्टी असल्या कारणाने दोघेजण आई समवेत धुणे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावावर गेली होती. यावेळी हे दोघेजण तलावातील पाण्यात खेळत होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचे पाय गाळात रुतले, यावेळी दोघांनी हातात हात घालून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. आणि काळाने त्यांचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments