सोनलगी ता. जत येथील बोर नदी पात्रात विवाहित महिलेचा बुडून मृत्यूजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदीच्या काठावर कपडे धुण्यास गेलेली महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. सोनाली तुकाराम कांबळे (वय २६) असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी ७ वाजता बोर नदीच्या काठावर मृतदेह तरंगताना सापडला आहे.
         मृतदेहाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक, उमदी पोलीस व सांगलीच्या बचाव पथकाने प्रयत्न केले. या महिलेचा शोध घेण्यासाठी गावकरी गेल्या १६ तासापासून प्रयत्न करीत होते. मात्र ती सापडली नव्हती. आज मंगळवारी सकाळी मृतदेह सापडला आहे. सध्या घटस्थापना व दसरा सणाच्या निमित्ताने घरातील स्वच्छता मोहीम ही प्रत्येक घराघरात सुरू असते. सध्या बोर नदीला पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे महिला, नागरिक कपडे व घरातील इतर साहित्य स्वच्छ करण्यासाठी नदीकाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे सोमवार दि.४ रोजी सोनाली तुकाराम कांबळे (वय २६) ही महिला दुपारी तीन वाजता कपडे धुण्यास गेली. त्या दोन्ही पायांनी अपंग होत्या. कपडे धुऊन काढताना पाय घसरून त्या पाण्यात पडल्या होत्या. गावात ही बातमी कळताच तात्काळ शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र त्या सापडल्या नाहीत. शोध मोहीम सुरू असताना उमदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. सांगली वरून बचाव पथक बोलावण्यात आले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत पोहचले नव्हते. तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध घेण्यास अडचणी निर्माण येत होत्या. अखेर मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडला. शवविच्छेदन करण्यासाठी जत येथे पाठवला. दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनाली यांचे पती दोन वर्षांपूर्वी मयत झाले आहेत. तेही अपंग होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. सोनाली मोलमजुरी करून राहत होत्या. आता ही दोन्ही मुले अनाथ झाली या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments