कुणीकोणूर येथे माजी सैनिकाकडून हवेत गोळीबार । उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे माजी सैनिक गंगाराम जयराम लमाण (चव्हाण, वय ३९) यांनी घरासमोरील अंगणात परवाना धारक पिस्तूलने हवेत गोळीबार केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुणीकोणूर येथे सेवालाल मंदिराजवळ माजी सैनिक गंगाराम लमाण रहातात. त्यांनी रात्री साडेदहा वाजता घरासमोरील अंगणात येऊन परवानाधारक पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला. हवेत तीन फैरी झाडल्या आहेत. पिवळ्या धातुचे ३ मोकळ्या केस (पुंगळ्या) सापडल्या असून. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम पोलीस कायदा १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments