जत तालुक्यातील जनतेची मंञी जयंतराव पाटील फसवणुक करत आहेत ? | जतचा कारखाना सभासदांच्या नवे करा; आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय कांबळे | १३ ऑक्टोबर रोजी संख्या येथे आरपीआयचा मेळावा


जत/प्रतिनिधी: जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावांना म्हैशाळचे पाणी मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्या संदर्भात बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बाबामहाराज मंगल कार्यालय संख तालुका जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जत तालुक्याच्या वतीने भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
         यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जत तालुक्यातील पूर्व भाग हा नेहमी दुष्काळी भाग आहे. या भागातील 64 गावे हे पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. म्हणून आम्ही आरपीआयच्या वतीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच जत तालुक्यातील व शेतकऱ्यांच्या हक्कांचा २० हजार सभासदांचा कारखाना मंत्री जयंत पाटील यांनी विकत घेतला आहे. तो कारखाना परत शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे. जर तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासत असाल तर तो कारखाना सभासदांच्या नावे करावा. फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही जत तालुक्यात दौरे व मेळावे घेत आहात. परंतु या तालुक्याचे सुखदुःख तुम्हाला नाही, जरी आमचा पक्ष मोठा नसला तरी आम्ही कायम तालुक्याच्या हितासाठी लढत असतो. जत कारखाना सभासदांना मिळालाच पाहिजे तालुक्याला पाणी हे मिळालेच पाहिजे हि आमची ठाम भूमिका आहे. मंत्री जयंत पाटील यांना आवाहन आहे कि, जत तालुक्याला किती टीएमसी व कुठून पाणी देणार याचा त्यांनी आम्हाला जीआर दाखवावा. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बंद करा असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.
         यावेळी शंकर वाघमारे सर, विलास बाबर, किशोर चव्हाण, विनोद कांबळे, विलास साबळे, प्राध्यापक हेमंत चौगुले, संजय कांबळे पाटील, प्रशांत ऐदाळे, बादल कांबळे, राम नरहट्टी उपस्थित होते.

◆व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇


Post a Comment

0 Comments