जत मधील ‘पीएसबी ज्वलर्स’ च्या दागिण्यावरील विमा संरक्षणाचा फायदा । चोरीला गेलेल्या दागिण्याचे पैसे मिळाले परत । पीएसबी ज्वेलर्स’ने दिले ग्राहकांच्या दागिने सुरक्षिततेला प्राधान्य



जत/प्रतिनिधी: जत शहरासह तालक्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या ‘मेसर्स प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्स’ (पीएसबी) ने दागिने खरेदीवर विमा कवच सुविधेमुळे शहरातील विद्यानगर येथील अंगणवाडी सुपरवायझर दिपाली प्रशांत बुरुड यांना दागिने चोरीला गेल्यानंतर दागिन्यावरील विम्यामुळे दागिण्यावरील रक्कमेचा विमा कंपनीकडून भरपाई मिळाली आहे. जत तालुक्यात प्रथमच ‘पीएसबी ज्वेलर्स’ने दागिने खरेदीवर विमा सुरक्षा उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा बुरूड यांना फायदा झाला आहे. अशी सुविधा देणारे प्रकाश बंडगर यांचे तालुक्यातील एकमेव ज्वेलर्सचे शोरुम आहे.
        जतमधील ‘पीएसबी ज्वेलर्स‘ही सोने, चांदीच्या दागिन्यांचे प्रसिद्ध शोरुम. तरुण वयातच प्रकाश बंडगर यांनी या सराफी व्यवसायात नाव कमाविले आहे. शुद्ध व उच्च प्रतीचे सोने, पारदर्शी व्यवहार आणि दागिन्यांची सुरक्षिततेला या घटकांना प्राधान्य दिल्यामुळे ग्राहक दागिने खरेदीला ‘पीसबी ज्वेलर्स‘ला आवर्जून पसंत देतात. ग्राहकांनी खरेदी केलेल्या दागिन्याला सुरक्षितता मिळावी यासाठी पीएसबी ज्वेलर्स व दागिन्यावर विमा सुविधा देणारी ‘ओलॉकर’कंपनी यांनी संयुक्तपणे दागिने खरेदीला विम्याचे सुरक्षा कवच ही सुविधा उपलब्ध केली आहे. चोरी, घरफोडी, नैसर्गिक आपत्ती, आग, वीज, चक्रीवादळ, वाहतुकीदरम्यान नुकसान यासारख्या विशिष्ट जोखमीमुळे उद्भवणाऱ्या नुकसानीपासून विम्याद्वारे संरक्षण मिळते. दागिने खरेदीवरील विमा सुरक्षा योजनेमुळे ग्राहकांची गुंतवणूक सुरक्षित बनली आहे. दागिने चोरीला गेल्यास विम्यामुळे रक्कम उपलब्ध होऊ शकते. या विमा सुरक्षा योजनेचा फायदा जत येथील ग्राहकाला आला आहे.
        जतमधील विद्यानगर मधील दिपाली बुरुड या अंगणवाडी सुपरवायझर आहेत. त्या कामानिमित्त दोन एप्रिल २०२१ रोजी डफळापूर येथील अंगणवाडी क्रमांक ७४ व ६८ येथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा अंगणवाडी सेविका जिजाबाई संकपाळ म्हणाल्या की, ‘मॅडम परिस्थिती वाईट आहे. तुम्ही दागिने घरीच ठेवत जा’तेव्हा बुरुड यांनी गळयातील गंठण काढून पर्समध्ये ठेवले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जीपमधून जतला गेल्या. एमएसईबी ऑफिस समोरील रस्त्यावर उतरुन घराकडे पायी जात होत्या आईचा फोन आला. फोनवर बोलत जात असताना समोरुन दोघे मोटारसायकलस्वारे आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला हातेा. त्यांनी हातातील पर्स हिसकावून नेत ते सांगली दिशेने पसार झाले. पर्समध्ये साडेतीन तोळयाचे सोन्याचे गंठन व अन्य साहित्य होते. त्यांनी यासंबंधी पोलिस ठाण्यात एप्रिल २०२१ मध्ये फिर्याद दिली होती. त्याचा तपास अजून लागलेला नाही, विमा कंपनीच्या नियमानुसार व बुरूड यांच्या पॉलीसीनुसार चोरीला गेलेल्या साडेतीन तोळे सोन्याच्या दागिण्याचे पैसे विमा कंपनीने त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. शिवाय ‘पीएसबी ज्वेलर्स‘च्या दागिने खरेदीवरील विमा सुरक्षा योजनेमुळे चोरीला गेलेल्या दागिन्याची रक्कम त्यांना मिळाली आहे. यामुळे बुरुड कुटुंबाने ‘पीएसबी ज्वेलर्स’ विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शुध्द व प्रशस्त शोरूम तसेच अनेक सुविधा-
जत तालुक्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही सराफ व्यवसायात नाविन्यपुर्ण बदल करून शुध्द व स्वच्छ दागिणे उपलब्ध करून दिले आहेत. आमच्या शोरूममध्ये दसरा,  दिवाळीसाठी अनेक योजना सुरू आहेत. जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या प्रशस्त शोरूमला एकवेळ आवश्य भेट द्यावी.
                           ~प्रकाश बंडगर, संचालक

 


Post a Comment

0 Comments