जत येथे चोरी प्रकरणी एकास अटक । शहरातील चोरीच्या घटनेतील फिर्यादीनी संशयिताला ओळखले । जत पोलिसांची कामगिरी



जत/प्रतिनिधी: शहरात गेल्या काही दिवसात बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर झालेल्या दोन व महाराणा प्रताप चौक येथील एक अशा चोरीच्या घटना घडल्या होत्या. वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता जत पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने शुक्रवारी पुन्हा चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण श्रीनिवास अकलू (वय २५, रा.अंबरनाथ, ता.कल्याण जि.ठाणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तिन्ही घटनातील फिर्यादीने संशयिताला ओळखले आहे. मात्र संशयित व्यवस्थित माहिती देत नसल्याने तपास करण्याचे मोठे आवाहन पोलीसांसमोर आहे. दरम्यान त्याला जत न्यायालयासमोर उभे केले असता मंगळवार १२ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
         पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, १९ संप्टेबरला सिध्दनाथ (ता.जत) येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले यांनी जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून काढलेले शेतमालाचे पावनेचार लाख रूपये, २३ संप्टेबरला जत शहरातील विठोबा आप्पा साळे यांचे बँकेतून काढलेले ५० हजार स्टेट बँकेसमोरील भाजीपाला बाजारातून तर २७ संप्टेबरला अचनहळ्ळी येथील मोहसीन मणेर यांचे महाराणा प्रताप चौकातून दिड लाख अशा तीन घटनामध्ये पावनेसहा लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले होते. आठवड्यात घडलेल्या तिन्ही चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन पोलीसासमोर होते.
         पोलीस निरिक्षक उदय डुबुल यांनी अनुभव पणाला लावत चोरीच्या मंगळवार व शुक्रवारी अशा घडलेल्या घटनेच्या आधारे शुक्रवारी बँक व शहरातील काही चौकात सिव्हिल ड्रेसमध्ये सापळा लावला होता. त्यात संशयित लक्ष्मण अकलू हा संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याला सतर्क नागरिक भिमाशंकर लोणी व पोलीसांनी हाटकले मात्र त्यांने तेथून पळ काढला. पोलीसांनी त्याचा पाटलाग करून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान पळताना संशयित अकलू पडल्याने त्यांच्या पायास दुखापत झाली आहे. दरम्यान पोलीस त्याच्याकडे कसून तपास करत आहेत. मात्र तो वेगवेगळी चुकीची माहिती देत असल्याने चोऱ्यांचा शोध लावणे जिकीरीचे बनले आहेत. मात्र तिन्ही घटनेतील फिर्यादीने संशयितला ओळखले आहे. संशयिताचे साथीदार व मुद्देमाल अन्य घटनेचा शोध लावण्याचे पोलीसांसमोर आवाहन आहे.

Post a Comment

0 Comments