जत येथे एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकसंघ पणे काम करू; कर्नल भगतसिंग देशमुख जत/प्रतिनिधी: तालुक्यातील माजी सैनिकांच्या ज्या काही समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी संघटना असणे गरजेचे आहे. कोणतेही कठीण काम सर्वांनी एकत्र येऊन केल्यास ते नक्कीच सार्थकी लागते. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व संघटनेला हातभार लावावा असे मत महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळाचे अध्यक्ष कर्नल भगतसिंग देशमुख यांनी जत येथील एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
         यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे म्हणाले की, तालुक्यातील माजी सैनिकांवर होणारे अत्याचार तसेच वीर माता व वीरपत्नी यांच्यासाठी सहयोग करणे तसेच माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व संस्था वाढीसाठी एकसंघ पणे काम करू, त्याच बरोबर सामाजिक कार्य ही करू. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
        यावेळी से.नि. सुभेदार मेजर (ऑन. कॅप्टन) बबनराव जगन्नाथ कोळी उपाध्यक्ष, से.नि. हवालदार महेशकुमार वामन जगताप उपाध्यक्ष, से.नि. हवालदार बाळासाहेब दादासाहेब भोसले सचिव, से.नि. हवालदार विजय गोविंद पवार खजिनदार, से.नि. हवालदार दत्तात्रय आकाराम शिंदे खजिनदार, से.नि. सुभेदार मेजर (ऑन. कॅप्टन) विजय शिवाजी कुरणे सदस्य, से.नि. ऑन. सुभेदार मेजर आकाराम गणपती बिसले सदस्य, से.नि. ऑन. सुभेदार मेजर सिध्दु रामू गायकवाड सदस्य, से.नि. ऑन. सुभेदार मेजर सतिश रंगराव शिंदे सदस्य, से.नि. हवालदार दिपक आनंदा खांडेकर सदस्य यांचेसह एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व माजी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments