भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने प्रभातफेरी

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग


जत/प्रतिनिधी: दिवाणी न्यायालय क स्तर जत येथे दिनांक २ ऑक्टोंबर २०२१ रोजी गांधी जयंतीनिमित्त मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांनी दिलेल्या निर्देशनाप्रमाणे दिनांक २ ऑक्टोंबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात येणा-या आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाची जत तालुका विधी सेवा समिती जत वतीने गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजनाने सुरुवात करणेत आली.
         सदर कार्यक्रमास जत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए. को. चौगले साहेब, सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव साहेब, जत तालुका विधीज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर. डी. कदम तसेच विधीज्ञ एस. बी. सौदागर वकील व इतर विधीज्ञ हजर होते. तसेच जत न्यायालयाचे सर्व कर्मचारी हजर होते.
        सदर कार्यक्रमानिमित्त जत गावामध्ये दिवाणी न्यायालय जत येथून सकाळी प्रभातफेरी काढणेत आली. सदर प्रभातफेरीत ए. को. चौगलेसाहेब, अध्यक्ष जत तालुका विधी सेवा समिती, सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव साहेब, जत विधीज्ञ संघटनेचे अध्यक्ष आर. डी. कदम वकिल व सर्व विधीज्ञ, दिवाणी न्यायालय जत येथील सर्व कर्मचारी वृंद व जत हायस्कूल जत येथील विदयार्थी, श्री राजे रामराव विदयामंदीर येथील विदयार्थी व श्री राजेरामराव विदयालयातील विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जत पोलीस निरीक्षक डुबुले साहेब तसेच उमदीचे सपोनि पवार साहेब व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments