जत महसूल विभागाकडून वाळू तस्करांवर कारवाई; एक ट्रॅक्टर ताब्यात


जत/प्रतिनिधी : जत तालुक्यात वाढत्या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर तस्करांना जत महसूल विभागाकडून कारवाईचा दणका देण्यात आला आहे. शहरालगतच्या डोण परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. शनीवारी पहाटे पावने सहाच्या सुमारास रोहीदास शिवाजी कांबळे रा.विठ्ठल नगर जत यांच्या एमएच १०/००९४ या ट्रॅक्टरमधून डोण भागातून विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याच्या संशयावर जत तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला आहे.

         जत तहसील कार्यालय परिसरात वाळू तस्करी होत असल्याचे अनेकवेळा समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मंडल अधिकारी, तलाठी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. तब्बल सहा महिन्यानंतर वाळू तस्करां विरोधात पहिली कारवाई करण्यात आली आहे. अव्वल कारकून मुलाणी, मंडल अधिकारी संदिप मोरे, तलाठी रविंद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी यांनी हि कारवाई केली आहे.

जत तहसील कार्यालयाकडील काही कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी व कोतवालांना वाळू तस्कराकडून मिळकत मोठी असल्याने कारवाई गुंडाळली जात होती. अनेकवेळा तोंडे बघून कारवाईचे गौडबंगाल सातत्याने प्रश्नचिन्ह उभे करत होते. तहसीलदार बनसोडे यांनी अशा छुप्या रूस्तमवर कारवाईचा दणका देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments