जतेत पारंपरिक पद्धतीने शमीपूजन व विजयादशमी "दसरा" सण उत्साहात साजराजत/प्रतिनिधी:  जत येथे पारंपरिक पद्धतीने शमीपूजन व  विजयादशमी "दसरा" सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे पार्श्वभूमीवर गेली दोनवर्षे दसरा सण साजरा करण्यात आला नव्हता. नुकतेच राज्यसरकारने कोरोनाचे निर्बंध शिथील करून घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे कोरोनाचे नियमांचे पालन करित सुरू करण्यास परवानगी दिल्याने देविच्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेपासूनच नवरारात्रीत भाविक भक्त लवकर उठून जत नगरिची ग्रामदेवता श्री. रेणुका देवी(यल्लमा) व डोंगरनिवासिनी श्री. अंबाबाई मंदिराला जाण्यासाठी निघत होते. व नवदिवस देविचा जागर करित होते. शुक्रवारी नवरात्रीची सांगता झाली व भाविक भक्तानी विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. 
         जतचे डफळे संस्थानिक व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे यांनी जत ऐतिहासिक डफळे यांचा जुना राजवाडा असलेल्या अवलिया चिनगीबाबा दरबारातून पालखी काढली. या पालखीत धारदार शस्त्रे ठेवून त्याची मिरवणूक शहरातील श्री. राममंदिर मार्गे थोरल्यावेशितील मारूती मंदिरापर्यंत नेऊन त्या ठिकाणी थांबविण्यात आली. जत शहरातील थोरल्यावेशितील मारूती मंदिरासमोरील भव्य पटांगणात अगोदरच श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत च्या कार्यकर्ते यानी शमीच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याचा ढीग लावला होता सुरक्षेच्या कारणास्तव   सभोवताली वर्तुळाकार रिंगण मारले होते. 
         सुरुवातीला डफळे संस्थानिक व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी शमीची विधिवत पुजा संस्थानचे पुरोहित श्री. रमेश पुरोहित यांच्या हस्ते करवून घेतली. त्यानंतर श्री. गणेशाची व माता श्री. दुर्गादेवीची आरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित लोकांनी सोनेलुटीचा (आपट्यांची पाने) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी लोक एकमेकांच्या अंगावर पडून सोने हिसकावून घेत होते. 
         हा दसरेचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे कार्यकर्ते अमर जाधव, राहुल जाधव, महादेव माळी, पापा सनदी, प्रा.कुमार इंगळे, अनिल शिंदे, प्रा.शिवाजीराव चव्हाण, गणपतराव कोडग, अरूण उर्फ बारू शिंदे, प्रा.चंद्रसेन मानेपाटील, मदन जाधव, श्रीकृष्ण पाटील, डाॅ. विजय पाटील, जतचे पोलीस पाटील मदन पाटील आदीनी सहकार्य केले. 
        यावेळी पी.डी.कटरेसर, मोहन चव्हाण,  बाळासाहेब जाधव, भारत गायकवाड, बसवराज अलगूर महाराज, शिवसेना नेते दिनकर पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments