जत‌ दरोड्यातील तिघा संशयिताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केले जेरबंदजत/प्रतिनिधी: जत येथे दि. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून ५ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करुन पोबारा केलेल्या तिन संशयिताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
       अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा प्रकाश सूर्यवंशी (वय २५ रा. बिटलेवाडी, ता. खटाव, जि. सातारा), अनुराग राजेश्वर सिंग (२२, विश्रांतीवाडी पुणे) आणि सोन्या खंडेश्वर शिवाजी तांबे (१९ रा. विश्रांतीवाडी पुणे) यांचा समावेश आहे.
        याप्रकरणी सरीता विजय जाधव (रा. शिवानुभव मंडप जत) यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. घटनेची माहिती अशी की, तिघेही आरोपी मित्र असून ते बेरोजगार आहेत. मागील महिन्यात रक्षाबंधनाच्या पूर्वी तिघेही भेटले असता पैसे मिळविण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांनी ठरविले होते. त्यावेळी संशयीत आरोपी कृष्णा याने माझा मित्र विजय जाधव हा सध्या खूनाच्या प्रयत्नामध्ये आतमध्ये असून त्याकडे किंमती मुद्देमाल असल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव याचे घर फोडायचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तिघांनी अन्य काही साथीदारांच्या मदतीने जत गाठले. तेथे जाधव यांच्या घराचा दरवाजा मध्यरात्रीच्या सुमारास ठोठावला. संशयीतांनी आपण विजय यांचे मित्र असल्याचे सांगितल्याने दरवाजा उघडताच चाकूचा धाक दाखवून ४ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख ७० हजार असा एकूण ५ लाख २२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता.

Post a Comment

0 Comments